मंचर- भागडी (ता. आंबेगाव) येथील अविनाश राजू जाधव या विद्यार्थ्याने बारामती येथील डॉ.अप्पासाहेब पवार कृषी आणि संलग्न महाविद्यालयात पशुसंवर्धन विभागात महाविद्यालयीन परीक्षेत गेली चार वर्षे प्रथम क्रमांक मिळविला. याबद्दल प्राचार्य नीलेश नलवडे यांच्या हस्ते अविनाश जाधव याचा सन्मान करण्यात आला. या कार्यक्रमाला कृषी, पशुसंवर्धन, कृषी व्यवसाय व्यवस्थापन, फार्मसी, कृषी तंत्रनिकेतन विभागाचे विभागप्रमुख आणि विद्यार्थी उपस्थित होते. 2018-19 या शैक्षणिक वर्षामध्ये अविनाश जाधव याची महाविद्यालयाच्या विद्यापीठीय विद्यार्थी परिषदेच्या अध्यक्षपदी निवड करण्यात आली होती.
महाविद्यालयांतर्गत राबविण्यात येत असलेल्या एनएसएस कॅम्प, गणेशोत्सव, शिवजयंती, कृषिक इत्यादी उपक्रमांत अविनाश जाधव यांनी नेतृत्व केले आहे. ऍग्रीकल्चर डेव्हलपमेंट ट्रस्ट बारामतीचे संचालक राजेंद्र पवार, आप्पा हिंगणे, समन्वयक प्रशांत तनपुरे, विभागप्रमुख आशिष रायकर, सागर शिंदे, डॉ. धनंजय भोईटे, डॉ. श्रीकृष्ण खंदारे, प्रा. संदीप गायकवाड, जया तिवारी यांनी अभिनंदन केले. आंबेगाव तालुक्यातील शिक्षक संघाचे वरिष्ठ पदाधिकारी राजू जाधव यांचा अविनाश हा मुलगा आहे.