मंचर (पुणे) -आंबेगाव तालुक्याच्या पूर्व भागातील अवसरी बुद्रुक येथे भाजीपाल्याचे दुकान सुरू ठेवून गर्दी केल्याप्रकरणी एका महिलेच्या विरोधात मंचर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
अवसरी बुद्रुक येथील भैरवनाथ मंदिराजवळ या महिलेने भाजीपाल्याचे दुकान सुरू ठेवून दुकानात ग्राहकांची गर्दी केली. कोणतेही सुरक्षित अंतर न ठेवता करोनाच्या पार्श्वभूमीवर असलेल्या नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी मंचर पोलीस ठाण्याचे सुदर्शन माताडे यांनी फिर्याद दिली आहे.