कार्ला, (वार्ताहर) – औंढे खुर्द गावाच्या हद्दीत एक मराठाकालीन बारव म्हणजे पायऱ्यांची विहीरीवर एक शिलालेख आढळून आला आहे. विहीरीचा आकार चौरसाकृती असून त्यात उतरण्यासाठी दक्षिणेकडून पायऱ्या आहेत. पायऱ्यांच्या उजव्या भिंतीवर बारवेच्या निर्मितीचा ४ ओळींचा उठावदार शिलालेख असून बारव व शिलालेखाची नोंद यापूर्वी कुठेही झालेली नाही.इतिहास अभ्यासक दीपक पटेकर यांनी हे संशोधन केले आहे.
नाणे मावळातील औंढे खुर्द हे ऐतिहासिक गाव. गावात नागनाथ महादेवाचे जूने देऊळ व त्यासमोर मंदिराचेच प्राचीन अवशेष, वीरगळ, भोसले मोकादम यांची स्मृतिशिळा, शिव-पार्वतीची ‘रावणानुग्रह’ मूर्ती आहे. जवळच गोवत्स शिळा आहे. हे शिल्प गुरांना चरण्यासाठी दान दिलेल्या गवताळ जमिनीवर सामान्यतः आढळून येते.
गावाच्या दक्षिणेस ‘धामणदऱ्या’च्या पायथ्याला एक कातळात कोरलेली पाणपोढी आहे. पोढी म्हणजे पाणी साठवण्यासाठी तयार केलेली टाकी. औंढे खुर्द गावाच्या हद्दीत एक मराठाकालीन बारव म्हणजे पायऱ्यांची विहीरीवर एक शिलालेख आढळून आला आहे. विहीरीचा आकार चौरसाकृती असून त्यात उतरण्यासाठी दक्षिणेकडून पायऱ्या आहेत. पायऱ्यांच्या उजव्या भिंतीवर बारवेच्या निर्मितीचा ४ ओळींचा उठावदार शिलालेख असून बारव व शिलालेखाची नोंद यापूर्वी कुठेही झालेली नाही.
ही बारव एका शेतात असल्यामुळे शेतीसाठी तिचा उपयोग होत असणार. पण मार्गालगतही असल्यामुळे प्रवाशांना या पाणवठ्याचा काही उपयोग होत असावा का? या बारवच्या शोधभटकंतीसाठी शिवाजी गाडे, नितीन म्हसकर व अपूर्व मराठे यांचे सहकार्य लाभले. तसेच शिलालेखाचा अभ्यास इतिहास अभ्यासक दीपक पटेकर यांनी करून उजेडात आणला.