काटेवाडी, (वार्ताहर)- महाराष्ट्र राज्य पांचाळ सोनार समाज महामंडळ बारामती तालुका सोनार समाज मंडळ कार्यकारणी जाहीर करण्यात आली. पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष महेश भास्करे यांच्या उपस्थितीमध्ये ही कार्यकारिणी निवडण्यात आली.
महाराष्ट्र राज्य पांचाळ सोनार समाज महामंडळ गेली अनेक वर्षे सोनार समाजाचे प्रश्न सोडवण्याचे काम करत आहे. याच धरतीवर बारामती तालुक्यांमध्ये देखील सोनार समाजाच्या अनेक प्रश्नांना न्याय देण्यासाठी ही कार्यकारिणी तयार करण्यात आली आहे. महेश भास्करे म्हणाले, संपूर्ण राज्यामध्ये सर्व समाजाची संघटना आहे.
या सर्व संघटनेच्या माध्यमातून प्रत्येक समाजाचे प्रश्न सोडवले जात आहेत. सोनार समाज देखील राज्यामध्ये मोठ्या प्रमाणात अस्तित्वात आहे; परंतु तो आपापल्या व्यवसायासाठी विखुरला गेला असल्याने या समाजाला प्रत्येक तालुक्यामध्ये एकसंघ बांधण्यासाठी महाराष्ट्र राज्य पांचाळ सोनार समाज महामंडळच्या माध्यमातून संघटन करून प्रत्येक तालुक्यामध्ये सोनार समाजाची संघटना स्थापन करण्यात आले आहे.
सोनार समाजाचे अनेक प्रश्न प्रलंबित असून प्रत्येक व्यक्ती आपापले प्रश्न निर्माण करत आहे हे प्रश्न सर्व सामान्य नागरिकांसाठी महत्त्वाचे असल्याने हे प्रश्न संघटनेच्या माध्यमातून सर्वांना बरोबर घेऊन संघटनेच्या माध्यमातून सोडवले जाण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत व त्यामुळेच बारामती मध्ये महाराष्ट्र राज्य पांचाळ सोनार समाज महामंडळाचे कार्य कारिणी निवडण्यात आली असल्याचे मत महेश भास्करे यांनी व्यक्त केले.
नवनियुक्त कार्यकारिणी
या कार्यकारिणीचेअध्यक्ष मोहन क्षीरसागर, उपाध्यक्ष राजेंद्र पंडित, सचिव दत्तात्रय जडे, कोषाध्यक्ष सुनील वेदपाठक, शहराध्यक्ष सुभाष क्षीरसागर, प्रसिद्धी प्रमुख पत्रकार गोकुळ टांकसाळे, कायदेशीर सल्लागार अॅड. संजय महामुनी यांची निवड करण्यात आली. तर सदस्य म्हणून प्रकाश कांबळे, शामराव धर्माधिकारी, प्रवीण होनमाने, रमेश कांबळे, हनुमंत पंडित, जगदीश कांबळे, गणेश पंडित यांची निवड करण्यात आली.