Bank Holidays : येत्या शुक्रवारपासून बँका सलग तीन दिवस बंद राहणार आहेत, त्यामुळे तुमची बँकांची सर्व कामे त्यापूर्वीच करू घ्या. जानेवारी 2024 मध्ये बँकांना दुसरा, चौथा शनिवार, रविवार आणि इतर प्रादेशिक सुट्ट्यांसह एकूण 16 सुट्ट्या देण्यात आल्या आहेत.
रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया (RBI) बँक सुट्ट्यांची यादी प्रसिद्ध करते, जी राष्ट्रीय/राज्यीय सुट्ट्या, सांस्कृतिक किंवा धार्मिक, ऑपरेशनल आवश्यकता, सरकारी घोषणा आणि इतर बँकांशी समन्वय यासह विविध घटकांवर आधारित असते.
या आठवड्यात बँका ‘या’ तारखांना बंद राहतील :-
25 जानेवारीला बँका बंद राहतील – 25 जानेवारी (गुरुवार) थाई पूसम/मुहम्मद हजरत अली यांची जयंती आहे. त्यामुळे तामिळनाडू, महाराष्ट्र, उत्तर प्रदेशमध्ये बँका बंद राहतील.
26 जानेवारी रोजी बँका बंद राहतील – 26 जानेवारी (शुक्रवार) बँका बंद आहेत. यावर्षी शुक्रवारी येणारा प्रजासत्ताक दिन ही राष्ट्रीय सुट्टी आहे. यानंतर चौथा शनिवार आणि रविवार आहे.
27 जानेवारीला बँका बंद राहतील – 27 जानेवारी चौथा शनिवार असल्यामुळे बँका बंद असणार आहेत.
28 जानेवारीला बँका बंद राहतील – 28 जानेवारी रविवार असल्यामुळे बँका बंद असणार आहेत.