वीसगाव खोरे, (वार्ताहर)– वरवडी खुर्द (ता. भोर) येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा जागतिक काव्य दिन उत्साहात साजरा करण्यात आला. इयत्ता तिसरी ते सातवीमधील विद्यार्थ्यांनी स्वयंस्फूर्तीने स्वरचित मुक्तहस्त केलेल्या अंकुर या कवितासंग्रहाचे प्रकाशन शाळेचे मुख्याध्यापक संजय पवार यांच्या हस्ते करण्यात आले.
या कविता संग्रहामध्ये विद्यार्थ्यांनी आपल्या भाव विश्वामध्ये अनुभवलेले विविध अनुभव, विचार, प्रेम वासल्य जिज्ञासा, शेतकरी, तिरंगा, आई, जीवन निसर्ग, मुलीची जिद्द, शिवरायांची यशोगाथा, शालेय परिसर, निसर्ग अशा विविध आशयाची कवितांचा यामध्ये समावेश आहे.
ललिता तुपे, समृध्दी काटकर, प्रिया वरे, राधिका भिलारे, संस्कार भिलारे, पायल वरे, अस्मी तुपे, श्रृती वरे, पृथ्वीराज तुपे, श्रेया भिलारे, आर्यन तुपे, ज्ञानेश्वरी तुपे, श्रेया वरे, आर्या भिलारे, अर्णव तुपे, आयुष तुपे, अनुष्का वरे, अक्षदा वरे यांनी लिहिलेल्या अंकुर या कवितांचे प्रकाशन करण्यात आले.
केंद्रप्रमुख प्रभावती कोठावळे यांच्या मार्गदर्शनाखाली मुख्याध्यापक संजय पवार, बापू जेधे, अनिल महांगरे, अमर क्षिरसागर यांच्या प्रेरणेतून कविता करण्यात आल्या. युवा नेते संदीप भिलारे, सतीश वरे, नितीन वरे यांनी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले.