नवी दिल्ली – पठाण या चित्रपटाचा वाद काही केल्या थांबताना दिसत नाही. भाजप मंत्र्याने चित्रपटावर आक्षेप नोंदवल्यानंतर सोशल मीडियावरून चित्रपटाविरोधात नाराजीचा स्वर उमटू लागला होता. आता या प्रकरणात बजरंग दलाने देखील उडी घेतली आहे. पठाणच्या प्रदर्शनाला विरोध करत बजरंग दल आणि हिंदू संघटनांच्या कार्यकर्त्यांनी एका मॉलमध्ये जोरदार हंगामा केल्याचे समोर आले.
अहमदाबादमधील वस्त्रपूर मॉलमध्ये हिंदुत्वादी संघटनांनी जोरदार तमाशा केल्याचे समोर आले. यावेळी संतप्त कार्यकर्त्यांनी मॉलमध्ये तोडफोड देखील केली. पठाणचे पोस्टर काढून फाडून टाकत कार्यकर्त्यांनी यावेळी शाहरुख खान विरोधात जोरदार घोषणाबाजी केली. याचे फोटो आणि व्हिडीओ देखील सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत.
Instead of tearing posters of a film and misusing Jay Shree Ram chants, if this bajrang dal people had helped needy people and poor people then Shree Ram could had been more happy. Education is the most powerful weapon which you can use to change the world #pathaan #ShahRukhKhan pic.twitter.com/x5Wiw5SWMd
— Nishant (@Nishant9916) January 4, 2023
यावेळी संतप्त कार्यकर्त्यांनी पठाण चित्रपट प्रदर्शित न करण्याचा इशारा देखील दिला. अभिनेत्री दीपिकाने परिधान केलेल्या कपड्यांना आमचा विरोध असून पठाण हा चित्रपट जेव्ह झिहादला प्रेरणा देणारा आहे असं बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांनी यावेळी म्हंटले. १० जानेवारीला पठाणचा ट्रेलर प्रदर्शित होणार असून त्या आधीच वाद पुन्हा सुरु झाल्याने चित्रपटाच्या प्रदर्शनावरच प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे.