मुंबई – पठाणनंतर शाहरुख खान आगामी डंकी चित्रपटाच्या शूटिंगमध्ये व्यस्त आहे. नुकतंच शाहरुख डंकी चित्रपटाच्या शूटिंगसाठी पुण्यात पोहोचला. येथील एका कॉलेजमध्ये त्याने हे गाणे शूट केल्याचे समोर आले आहे. या दरम्यानचे व्हिडिओ आणि फोटो खूप व्हायरल होत आहेत.पठाणनंतर शाहरुखचा जवान चित्रपट प्रदर्शित होणार आहे आणि त्यानंतर डंकी देखील याच वर्षी प्रदर्शित होणार आहे.
One more video of @iamsrk while he was snapped with the crew & police officers at the sets of #Dunki in #Pune pic.twitter.com/olam7faVh4
— Shah Rukh Khan Fc – Pune ( SRK Fc Pune ) (@SRKFC_PUNE) February 18, 2023
डंकीच्या सेटवरील शाहरुखचे अनेक व्हिडीओ आणि फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. व्हायरल व्हिडिओमध्ये शाहरुख खान आपल्या फॅन्स सोबत फोटो काढताना दिसत आहे. त्य्यासोबतच शूटिंगला मदत करणाऱ्या पोलिसांसोबत देखील शाहरुखने फोटो काढल्याचे समजते.
He is an emotion ♥️ one more video of @iamsrk from #Dunki shoot in #Pune pic.twitter.com/kGwnLlKCpB
— Shah Rukh Khan Fc – Pune ( SRK Fc Pune ) (@SRKFC_PUNE) February 18, 2023
शाहरुखच्या ‘पठाण’ चित्रपटाने कमाईच्या बाबतीत नऊशे कोटींहून अधीक कामे केली आहे. भारतासह इतर देशांमध्ये देखील पठाणची चांगलीच क्रेझ असल्याचे पाहायला मिळाले. डंकीमध्ये शाहरुख खानसोबत अभिनेत्री तापसी पन्नू देखील दिसणार आहे. राजकुमार हिरानी यांचा डंकी 23 डिसेंबर 2023 रोजी थिएटरमध्ये दाखल होणार असल्याच्या चर्चा आहे.