नगर, (प्रतिनिधी) – बहुजनांना शिक्षणाची गरज आहे, व त्यांच्या पर्यंत शिक्षण पोहचविणे ही आपणा सर्वांची व समाजाची जबाबदारी आहे. हे ब्रीदवाक्य घेऊन नगर जिल्हा मराठा विद्या प्रसारक समाज संस्था हे कार्य बहुजनापर्यंत शिक्षण पोहचवण्याचे काम अविरतपणे करीत आहे, असे प्रतिपादन कार्यक्रमाचे अध्यक्ष रामचंद्रजी दरे यांनी केले.
न्यु आर्ट्स कॉमर्स अँण्ड सायन्स कॉलेज, अ.नगर येथे आयोजित कै. ह. कृ. तथा बाळासाहेब काळे स्मृती करंडक राज्यस्तरीय आंतरमहाविद्यालयीन वत्कृत्व स्पर्धेच्या उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते. या वेळी माजी प्राचार्य खासेराव शितोळे हे उपस्थित होते. त्यांनीही कै. ह. कृ. तथा बाळासाहेब काळे यांचा शैक्षणिक, सामाजीक, संस्कृतीक व सहकार क्षेत्रातील कार्याची सविस्तर नोंदीसहित माहिती दिली.
तसेच या प्रसंगी महाविद्यालयाच्या निवृत्त माजी उप-प्राचार्या तसेच अंबिका महिला बँकेच्या संस्थापिका प्रा. मेधा काळे या उपस्थित होत्या. स्पर्धेचा समारोप व पारितोषिक वितरण समारंभ संस्थेचे विश्वस्त जयंतराव वाघ यांच्या अध्यक्षतेखाली पार पडला. त्यांनी कै. ह. कृ. तथा बाळासाहेब काळे (काका) यांनी सामाजासाठी केलेल्या कार्याची सविस्तर माहिती दिली.
या वेळी माजी प्राचार्य विश्वासराव काळे, प्रा. पोपटराव काळे, प्रा. सुनीलराव मांढरे, प्रा. आरती साबळे-मांढरे हे उपस्थित होते. यावेळी प्राचार्य डॉ. बी. एच्. झावरे, कला शाखेचे उपप्राचार्य डॉ. बी. बी. सागडे, वाणिज्य शाखेचे उपप्राचार्य डॉ. एस. बी. कळमकर, विज्ञान शाखेचे उपप्राचार्य डॉ. डी. आर. ठुबे, सर्व विभागातील विभागप्रमुख तसेच महाविद्यालयातील प्राध्यापक उपस्थित होते. या स्पर्धेमध्ये राज्यातील वेगवेगळ्या महाविद्यालयातील २० स्पर्धक विद्यार्थी सहभागी झाले होते.
स्पर्धेसाठी परीक्षक म्हणून अकलूज येथील समीर गायकवाड व सोलापूर येथील विठ्ठल साळुंके यांनी काम पाहिले. सूत्रसंचालन दोन सत्र असल्यामुळे प्रा. सुवर्णा कदम व डॉ. निलिमा विखे यांनी केले. प्रास्ताविक डॉ. ए. के. अंबाडे यांनी केले. या प्रसंगी डॉ. सय्यद मेहबूब, डॉ. पी. टी. शेळके हे उपस्थीत होते. स्पर्धा यशस्वीतेसाठी प्रा. नीलेश लंगोटे, डॉ. निखिल गोयल, डॉ. नितीन काळे, प्रा. मयूर रोहोकले आदींनी कार्यक्रम यशस्वीतेसाठी परिश्रम घेतले.