बगदाद – इराकमध्ये बगदादच्या मध्यवर्ती भागात सलग तिसऱ्या दिवशी निदर्शने सुरू असून त्यात निदर्शनांमध्ये आणखी सहा निदर्शकांचा मृत्यू झाला. उम्म कास्र भागात झालेल्या हिंसाचारामध्ये तिघे निदर्शक मारले गेले आणि सुमारे 50 जण जखमी झाले, असे इराकी मानवाधिकार आयोगाने म्हटले आहे.
सुरक्षा रक्षकांनी बंदराचा मार्ग रोखण्याचा प्रयत्न करणाऱ्या निदर्शकांवर गोळीबार केला असल्याचे वृत्तसंस्थेच्या वृत्तामध्ये म्हटले आहे.
तसेच सुरक्षा दलांनी रबरी गोळ्या आणि अश्रुधुराच्या केलेल्या माऱ्यात इतर 20 जण जखमी झाले. इराकमध्ये एक ऑक्टोबरपासून आतापर्यंत 342 निदर्शकांचा मृत्यू झाला आहे. भ्रष्टाचार आणि सेवांची कमतरता यांच्याविरोधात हजारो निदर्शक रस्त्यावर उतरून निदर्शने करत आहेत.
सुरक्षा दलांशी त्यांच्या सतत चकमकी सुरू असून अहरर, जमुरिया आणि सिनाक इथल्या महत्त्वाच्या तीन पुलांच्या काही भागांचा ताबा निदर्शकांनी घेतला आहे.
निवडणूक सुधारणा आणि मंत्रिमंडळातील फेरबदलासह आंदोलनकांच्या मागण्या मुख्य नेत्यांनी जाहीरपणे मान्य केल्या आहेत आणि उपाययोजनाचे वचन दिले आहे.