नवी दिल्ली – भारताचे नवोदित बॅडमिंटनपटू अनुपमा उपाध्याय व किरण जॉर्ज यांनी पोलंड ओपन बॅडमिंटन स्पर्धेत अनुक्रमे महिला व पुरुष गटाचे विजेतेपद प्राप्त केले.
या स्पर्धेच्या पुरुष एकेरीच्या अंतिम लढतीत किरणने तैपेयीच्या चीया हाऊ ली याचा 21-15, 21-14 असा सरळ दोन गेममध्ये पराभव केला.
महिला गटाच्या अंतिम फेरीत अनुपमाने भारताच्याच अदीती भटवर 17-21, 21-14, 21-17 असा तीन गेमपर्यंत चाललेल्या सामन्यात पराभव केला. किरणचे हे यंदाच्या मोसमातील दुसरे विजेतेपद ठरले. अनुपमाचेही हे या मोसमातील दुसरे विजेतेपद आहे.