छत्तीसगडमधील सुकमा येथील सहदेव दिरदो नावाचा मुलगा या व्हायरल गाण्यामुळे रातोरात स्टार झाला.यातच सहदेव दिरदोचा मंगळावरी दुपारी स्कुटीवरुन ट्रीपल सीट प्रवास करत असताना त्याच्या गाडीला अपघातात झाला.
In touch with Sahdev’s family and friends. He is unconscious, on his way to hospital. Im there for him. Need your prayers 🙏
— BADSHAH (@Its_Badshah) December 28, 2021
यावेळी हेल्मेट न घातल्याने त्याच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली. अपघातानंतर अनेक तास सहदेव बेशुद्धावस्थेत होता. काही तासांनी तो शुद्धीवर आला असून त्याची प्रकृती धोक्याबाहेर असल्याचे कळत आहे.
सोशलवर त्याचे फोटो सध्या चांगलेच व्हायरल होत असून नेटकऱ्यांकडून सहदेवसाठी प्रार्थना केली जात आहे. तसेच त्याचा प्रकृती बाबत स्थानिक डॉक्टरांनी सांगितले की,’सहदेव आता बोलू शकतो. त्याचा सीटी स्कॅन व अन्य टेस्ट करण्यात आल्या आहेत. प्रकृती सुधारत असल्याने त्याला रायपूर वा विशाखापट्टनमला हलवण्याची गरज नाही. अपघानंतर 5 तासांनी सहदेवला शुद्ध आली.
दरम्यान, इंटरनेटवर सहदेवच्या ‘बचपन का प्यार’ या गाण्याने धुमाकूळ घातला. या गाण्यासाठी अगदी मुख्यमंत्र्यांपासून ते बॉलिवूडमधील गायकांपर्यंत अनेकांनी सहदेवचे कौतुक केले. तसेच अनेक कलाकारांनी यावर रिल्स तयार करुन शेअर केले होते.