अभिनेता आयुष्यमान खुरानाने “विकी डोनर’ या सुपर हिट चित्रपटातून बॉलीवूडमध्ये यशस्वीपणे पर्दापण केले. आयुष्यमान अल्पावधीतच आपल्या अभिनयाचा ठसा उमटविला आहे. अभिनयाबरोबर तो एक उत्कृष्ट गायक देखील आहे.
आपल्या पहिल्याच मूव्हीमध्ये त्याने गायलेले “पाणी दा रंग वैख के’ या गाण्याला प्रेक्षकांनी भरभरून प्रतिसाद दिला होता. बधाई हो, ड्रीमगर्ल, आर्टिकल 15, गुलाबो सिताबो, बाला या चित्रपटांच्या यशानंतर आयुष्यमान आता एका नवीन चित्रपट घेऊन येत आहे. या चित्रपटाचे नाव ‘डॉक्टर जी’ असे आहे.
या चित्रपटाचा फर्स्ट लूक त्याने नुकताच आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर शेअर केला आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शक अनुभूती कश्यप असणार आहेत. ‘डॉक्टर जी’ या सिनेमासोबत अनेक नावाचा त्याचा चित्रपट लवकर प्रदर्शित होणार आहे.
भारतातील सर्वात जास्त मानधन आकारणाऱ्या हिरोंपैकी आयुष्यमान खुराना एक आहे. करोनामुळे बऱ्याच चित्रपटाचे शूटिंग लांबणीवर पडले होते. पण आता जवळपास सर्व शूटिंग चालू झालेले आहे. त्यामुळे कलाकारदेखील खूश दिसत आहेत. बऱ्याच कलाकारांनी सेटवरुन आपले फोटो आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून आपल्या चाहत्यांसोबत शेअर केले आहेत.