– उदयकांत ब्राम्हणे
कोरेगाव भीमा – पेरणे फाटा (ता. हवेली) येथील विजय रणस्तंभास आकर्षक फुलांची सजावट करण्यात आली आहे. तसेच भीमा नदीवरील ऐतिहासिक पुलासही झेंडूच्या फुलांची सजावट करण्यात आली आहे.
विजय रणस्तंभास अभिवादन सोहळ्याची प्रशासनाकडून जय्यत तयार सुरू असून यावर्षी सात ते आठ लाख अनुयायी येण्याची शक्यता असून यासाठी दिमाखदार व देखण्या सोहळ्याचे आयोजन प्रशासनाच्या माध्यमातून करण्यात येत आहे.
विजय रणस्तंभास अभिवादन करण्यासाठी देशभरातून अनुयायी येणार असून प्रशासनाच्या वतीने अतिशय उत्कृष्ट सजावट करण्यात आली असून स्तंभावर लावण्यात येणाऱ्या सजावटीत तिरंगा साकारण्यात आला आहे.
आकर्षक अशोक चक्र साकारण्यात येत आहे. अवघ्या एका दिवसांवर आलेल्या सोहळ्यासाठी वाहन पार्किंग, मोबाईल शौचालय, भाविकांसाठी इतर सोयी सुविधा यावर भर देण्यात येत आहे.