पुणे – अतिप्रसंगास विरोध केल्याने एकाने अल्पवयीन मुलीवर ऍसिड हल्ला करण्याचा प्रयत्न केला. ही घटना शिवाजीनगर भागातील वडारवाडी परिसरात घडली. याप्रकरणी अक्षय राजू चव्हाण (वय 24, रा. मारुती मंदिराजवळ, वडारवाडी) याच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत अल्पवयीन मुलीच्या आईने चतु:शृंगी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
आरोपी चव्हाण अल्पवयीन मुलीचा पाठलाग करत होता. त्याने तिच्याशी अश्लील कृत्य करण्याचा प्रयत्न केला. फिरायला जाऊ असे सांगून त्याने अल्पवयीन मुलीवर अतिप्रसंग करण्याचा प्रयत्न केला. मुलीने त्याला विरोध केल्यानंतर त्याने ऍसिड सदृश ज्वलनशील द्रवपदार्थ फेकून मारण्याचा प्रयत्न केला, असे अल्पवयीन मुलीच्या आईने फिर्यादीत म्हटले आहे. सहायक पोलीस निरीक्षक गायकवाड तपास करत आहेत.