बलिया – उत्र प्रदेशातील प्रचारसभेमध्ये संरक्षण णंत्री राजनाथ सिंह यांच्या भेषणात आज काही युवकांनी अडथळा आणण्याचा प्रयत्न केला. सुरक्षा रक्षकांनी त्वरित हस्तक्षेप करून या युवकाला ताब्यात घेतले.
बांशी बझार येथे राजनाथ सिंह यांची सभा सुरू असताना हा प्रकार घडला. लष्करातील भरतीच्या मुद्यावरून एका युवकाने भाषणादरम्यान अडथळा आणला. लष्करातील भरती गेल्या तीन वर्षांपासून स्थगित आहे, असा दावा या युवकाने केला. त्यावर ही भरतीची प्रक्रिया आता सुरू करण्यात आली आहे, असे उतर राजनाथ सिंह यांनी दिले.
“जेंव्हा राजकीय नेत्यांशी चर्चा फिसकटते, तेंव्हा सर्व गोष्टी बिघडतात.’ असेही राजनाथ सिंह यांनी या युवकांना सांगण्याचा प्रयत्न केला. करोनाच्या साथीमुळे या प्रक्रियेत अडथळे आले होते. अशी अडचण प्रथमच आली आहे, असेही राजनाथ सिंह यांनी सांगण्याचा प्रयत्न केला. त्यावर या युवकांनी समाजवादी पार्टीचे अध्यक्ष अखिलेश यादव यांच्या समर्थनार्थ घोषणाबाजी करायला सुरुवात केली.
त्यावर भाजपच्या कार्यकर्त्यांनी या युवकाला तांबवण्याचा प्रयत्न केला. पण राजनाथ सिंहांनी त्याच्याकडे दुर्लक्ष करण्याची सूचना केली. नंतर पोलिसांनी या युवकाला ताब्यात घेतले.