लासुर्णे – बेलवाडी (ता. इंदापूर) येथील बॅंक ऑफ महाराष्ट्राच्या एटीएम सेंटरचे शटर तोडून एटीएममधील पैसे चोरण्याचा प्रयत्नवालचंदनगर पोलिसांच्या सर्तकतेमुळे चोरट्यांचा प्रयत्न फसला. अज्ञात चोरट्यांनी रविवारी (दि. 23) रात्री दोन वाजण्याच्या सुमारास गॅस कटरच्या सहाय्याने एटीएमचे शटर कापून आतमध्ये घुसण्याचा प्रयत्न केला.
यावेळी अचानक वालचंदनगर पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक दिलीप पवार, पोलीस उपनिरीक्षक सदाशिव जगताप, हवालदार सुरेश राक्षे, जगन्नाथ कळसाईत, सचिन गायकवाड, विजय शेंडकर हे रात्रीची गस्त घालत असताना एटीएम तपासणी करण्यासाठी गेले होते.
पोलीस आल्याचे समजताच चोरट्यांनी गॅस कटर व सिलेंडर जाग्यावर ठेवून पळ काढला. पोलिसांनी चोरट्याचा पाठलाग करून पकडण्याचा प्रयत्न केला होता. चोरी करण्यासाठी वापरण्यात आलेला गॅस सिलेंडर व कटर तोही चोरट्यानी जंकशन (ता. इंदापूर) येथील चोरी केलेला होता.