वाशिम – बसस्थानकावर उभ्या असलेल्या एसटी बसचे स्टेअरिंग एका मनोरुग्ण महिलेने (Manorugna women) ताब्यात घेतल्याने एकच खळबळ उडाली होती. वाशिम बस स्थानकावर (Washim bus stand) रिसोड जाणारी (बस क्र. एमएच 06- एस 8047) ही बस उभी करुन चालक नोंद करण्यासाठी नियंत्रण कक्षात गेल्यानंतर एक मनोरुग्ण महिला बसच्या केबिन मध्ये घुसली आणि तिने स्टेअरिंगचा ताबा घेतला.
त्याच बसमध्ये प्रवाशी बसत असल्याने काही वेळ हा प्रकार कुणाच्या ही निदर्शनास आला नाही. मात्र बस स्थानकावरील एका वाहकाच्या हा प्रकार निदर्शनास आल्या नंतर एकच खळबळ उडाली. त्यानंतर एसटीचे सुरक्षारक्षक, चालक आणि वाहकाने या महिलेला स्टिअरिंग वरून खाली उतरण्याची विनंती केली.
मात्र ती ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हती.
अखेर त्या महिलेच्या मुलाने आणि सुरक्षा रक्षकांनी मनोरुग्ण महिलेला बसच्या खाली उतरवले. पण ती काही बाहेर निघायचे नाव घेत नव्हती. आरडाओरड करत होती. तिला लोकांनी उचलून व राग धाक दाखवून तिला खाली उतरण्यास भाग पाडले. पण ती काही ऐकण्यास तयार नव्हती. त्यामुळे अखेर तिने नकार दिला.
चालकाने चावी काढलेली होती
अनेक एसटी बसेसला सुरू किंवा बंद करण्यासाठी चावी नसते. त्या बस विना चावी बटणावर सुरू होतात. सुदैवाने या बसला चावी होती. तसेच चालकाने चावी काढून बटन बंद केले होते. जर त्या बसला चावी असती तर ती बस त्या मनोरुग्ण महिलेने सुरू केल्यानंतर मोठा अनर्थ घडला असता. या घटने मुळे एसटी बस गाड्यांमधील चालकांच्या कॅबिन च्या सुरक्षेचा मुद्दा पुन्हा ऐरणीवर आला असून एसटी महामंडळाने उपाययोजना करण्याची मागणी होत आहे.