इंदापूर – राज्यभरात आज होळीचा सण साजरा होत असून उद्या रंगपंचमी आहे. त्यामुळे रंगपंचमीच्या पार्श्वभूमीवर सर्वांची तयारी सुरू आहे. रंगपंचमीच्या दिवशी गावोगावी पार्ट्यांचं नियोजन करण्यात येतं. मात्र इंदापूर तालुक्यातून अजब घटना समोर आली असून ऐन धुळवडीच्या मुहूर्तावर ८४ किलोचा शेरा बोकूड चोरीला गेला.
तालुक्यातील सरडेवाडी जवळच्या शिंदेवस्ती येथील युवा शेतकऱ्याच्या शेळी फार्म मधील अत्यंत रुबाबदार दिसणाऱ्या बिटल जातीच्या बोकडाची व उस्मानाबादी शेळीची चोरी कऱण्यात आली. त्यामुळे तालुक्यात या चोरीची चर्चा रंगली आहे.
या चोरीप्रकरणी पोलिसात तक्रार देण्यात आली आहे. बिटल जातीचा बोकड आणि उस्मानाबादी शेळीची चोरी झाले आहेत. यातील बोकडाचं किंमत जवळपास 40 हजार पेक्षा अधिक आहे. तर शेळीची किंमत 18 हजार रुपये असल्याचं सांगितलं जातंय. शेळी आणि बोकड चोरीला गेल्याचं कळल्यानंतर युवा शेतकरी अजय हवालदिल झाले आहेत.