वॉशिंग्टन – आधुनिक काळातील जीवनशैलीमध्ये वैवाहिक गोष्टींमध्ये विविध प्रकारचे पेच प्रसंग निर्माण होताना दिसत आहेत या सर्व पेच प्रसंगावर मात करणारा एक पेच एका दांपत्याच्या जीवनात निर्माण झाला आहे गेली.
काही वर्षे सुखा समाधानाने संसार करणाऱ्या या दांपत्याला अचानक असे लक्षात आले की आपण एकमेकांचे भाऊ-बहीण आहोत आपण ज्या मुलीबरोबर लग्न केले आहे ती आपली सावत्र बहिण असल्याचे या पतीच्या लक्षात आल्यामुळे त्यांच्यावर आभाळ कोसळल्यासारखीच परिस्थिती निर्माण झाली आहे एखाद्या चित्रपटात शोभेल असा हा प्रसंग आहे या घटनेतील पती आईसोबत एकटा राहात होता त्याला वडील नव्हते लहानपणापासून आईने त्याला त्याचे वडील कोण आहेत याची अजिबात कल्पना दिली नव्हती त्याची आई डॉक्टर होती.
आणि काही महिन्यांपूर्वीच कर्करोगाचे निदान झाल्यामुळे तिचे निधन झाले होते आई जिवंत असतानाच त्याने आपल्या आवडत्या मुलीबरोबर लग्न केले होते सासू आणि सून यांच्यात चांगले नाते निर्माण झाले होते आईच्या निधनानंतर पतीने आईच्या खोलीतील अनेक जुन्या गोष्टी बाहेर काढायला सुरुवात केली तेव्हा त्याला एक फोटोचा अल्बम सापडला या अल्बममध्ये आईसोबत अनेक लोकांची छायाचित्रे होती त्यामध्येच एक छायाचित्र आईचे आणि त्याच्या पत्नीच्या वडिलांचे होते ही गोष्ट लक्षात आल्यावर दोघांनी पत्नीच्या वडिलांकडे जाऊन याबाबत माहिती घेतली असता वडिलांनी माझे त्या महिलेबरोबर म्हणजे पतीच्या आई बरोबर संबंध होते.
आणि त्यातूनच ही मुलगी जन्माला आल्याचे सांगितले त्याच्या आईने आजपर्यंत ही गोष्ट लपवून ठेवली होती आणि तू माझा एकुलता एक मुलगा आहेस असेच सांगितले होते पण ह्या गोष्टीचा उलगडा झाल्यानंतर आपल्याला एक सावत्र बहिण आहे आणि तिच्याशीच आपण लग्न केले आहे ही गोष्ट त्याच्या लक्षात आल्यानंतर दोघांच्या जीवनामध्ये अभूतपूर्व पेच प्रसंग निर्माण झाला आहे.
त्याचे मित्र आणि इतर नातेवाईक यांना ही गोष्ट कळल्यानंतर अनेकांनी त्यांना डीएनए चाचणी करून घ्या असा सल्ला दिला आहे पण या मुलीच्या वडिलांनी अत्यंत ठामपणे आपल्या मुलीच्या जन्माबाबत माहिती दिली असल्यामुळे या दांपत्याला त्याबाबत कोणती शंका नाही पण भविष्यात जरी पती आणि पत्नी हे नाते ते कायम ठेवणार असले तरी भावी काळात मुलाला जन्म न देण्याचा निर्णय त्यांनी घेतला आहे.