मुंबई – बॉलिवूड अभिनेता अर्जुन कपूर अनेकदा मलायका अरोरासोबतच्या नात्यामुळे चर्चेत असतो. परंतु अर्जुनची बहीण अंशुला कपूरही तिच्या बोल्ड स्टाइलमुळे चर्चेत असते. अर्जुनची बहीण अंशुला बॉलीवूडच्या मोठ्या अभिनेत्रींपेक्षाही हॉट आहे असं तिच्या चाहत्यांचा म्हणणं आहे. नुकताच अंशुलाचा एक व्हिडिओ व्हायरल होत आहे. ज्यामध्ये ती मालदीवमध्ये सुट्ट्या घालवताना दिसत आहे.
अंशुलाने तिच्या इंस्टाग्रामवर एक व्हिडिओ पोस्ट केला आहे. तिच्या या व्हिडिओमुळे अंशुला तिच्या बोल्डनेसने चाहत्यांना आणखी वेड लावताना दिसत आहे. अंशुला कपूर मालदीवमध्ये व्हेकेशन एन्जॉय करत आहे. मालदीवमध्ये ती खूप मस्ती करताना दिसतीय. व्हिडीओमध्ये अंशुला मालदीवच्या बीचवर पोहण्याचा आनंद घेत असल्याचे दिसते. यासोबतच अंशुला जेवणाचा खूप आनंद घेत आहे. हा व्हिडिओ पोस्ट करताना अंशुला कपूरने कॅप्शनही दिले आहे.
तिने कॅप्शनमध्ये लिहिले की, Easy Breezy. 3 दिवस सनशाईन, सॉल्टी हवा आणि उत्तम फूड. मालदीव,मध्ये सर्वकाही मिळाले जे मी ऐकले होते. व्हिडिओमध्ये अंशुल पूर्ण वेळ एन्जॉय करताना दिसत आहे. वेगवेगळ्या दिवसाचा हा व्हिडीओ असल्याचे समजते.
View this post on Instagram
याआधी अंशुला कपूरचे वजन खूप जास्त होते. पण तिने वजन कमी केले. अंशुलाने स्वत:ला फिट बनवण्यासाठी खूप मेहनत घेते. तिच्या फिटनेसबाबतचेअनेक व्हिडिओ आणि फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. मात्र, या व्हिडिओने तिने पुन्हा एकदा चाहत्यांची मने जिंकली आहेत.