मुंबई- कोरोनाचा प्रादुर्भाव सगळीकडे वाढत आहे. त्यात सामान्य जनताच नाही तर अनेक मोठ्या बॉलीवूड अभिनेत्यांना कोरोनाची बाधा झाली आहे. मात्र या सगळ्यांनीच कोरोनावर यशस्वीरित्या मात केली आहे. भारताचा कोरोना रिकव्हरी रेट प्रचंड चांगल्या असल्याने अनेकांना दिलासा मिळाला आहे.
अभिनेता अर्जुन कपूरलाही कोरोनाची बाधा झाली होती. त्यानंतर तब्बल 30 दिवसांनी त्याची टेस्ट निगेटिव्ह आली. त्याने सोशल मीडियावर पोस्ट करून ही माहिती चाहत्यांना दिली. अर्जुनने शेअर केलेल्या या पोस्टवर चाहत्यांनी कमेंट करून त्याला आराम करण्याची विनंती केली आहे.
अर्जुन कपूरने चाहत्यांचे आभार मानले आहेत. त्याने आपल्या इंस्टाग्रामवर एक पोस्ट शेअर केली आहे. यामध्ये आपला कोरोनाचा रिपोर्ट निगेटिव्ह आल्याचं तो म्हणतो. मला आता बरं वाटतं आहे. हा व्हायरस गंभीर यासाठी आहे कारण मी विनंती करतो की, याला तुम्ही गंभीर स्वरुपात घ्या. कोरोनाचा प्रभाव ज्येष्ठ नागरिकांवर आणि लहानांवर दोघांवरही होतो. त्यामुळे आपली काळजी घ्या आणि मास्कचा वापर करा.