दुबई – आयपीएल स्पर्धेपूर्वीच्या लिलावात प्रचंड गाजावाजा केलेल्या ग्लेन मॅक्सवेलच्या अपयशामुळे किंग्ज इलेव्हन पंजाबला चांगलाच फटका बसताना दिसत आहे. जवळपास 11 कोटी रुपये बोली लावून आपल्या संघात घेतलेल्या मॅक्सवेलला अद्याप स्पर्धेत एकही षटकार फटकावता आलेला नाही.
या स्पर्धेत आतापर्यंत झालेल्या चार सामन्यांत पंजाबला केवळ एकदाच विजय मिळवता आला आहे. आक्रमक फलंदाजी व उपयुक्त गोलंदाजीसाठी ओळखला जात असलेला मॅक्सवेल सातत्याने अपयशी ठरत आहे. मुंबई इंडियन्सविरुद्धच्या सामन्यात त्याला 18 चेंडूत केवळ 11 धावाच करता आल्या.
यंदाच्या स्पर्धेत आतापर्यंत झालेल्या चारही सामन्यात खेळल्यानंतरही त्याच्या केवळ 30 धावा झाल्या आहेत. त्याच्या खात्यात केवळ दोन चौकार आहेत. त्याच्या अपयशामुळे पंजाबला मधल्या फळीत सातत्याने अपयश येत आहे.
करोडो रुपयांत खरेदी केलेल्या मात्र सुमार कामगिरीमुळे चर्चेत असलेल्या मॅक्सवेलबाबत असून अडचण नसून खोळंबा अशी पंजाब संघाची गत झाली आहे.