मुंबई – बॉलिवूड अभिनेता अरबाज खानची (Arbaaz Khan) गर्लफ्रेंड जॉर्जिया एंड्रियानी (Giorgia Andriani) बी-टाउन अभिनेत्रीपेक्षा कमी नाही. जॉर्जिया एंड्रियानी तिच्या ग्लॅमरस लुकसाठी प्रसिद्ध आहे. नुकतंच जॉर्जियाने तिचा लेटेस्ट बाथरूम सेल्फी सोशल मीडियावर शेअर केला आहे. जॉर्जियाच्या या लेटेस्ट फोटोंनी इंटरनेटवर आग लावली आहे. (Arbaaz Khan girlfriend)
बॉलीवूड सुपरस्टार सलमान खानचा भाऊ अरबाज खानने त्याची पहिली पत्नी मलायका अरोरासोबत घटस्फोट घेतल्यानंतर जॉर्जिया एंड्रियानीला डेट करत असल्यामुळे चर्चेत आहे. बऱ्याच दिवसांपासून अरबाज आणि जॉर्जिया एकमेकांसोबतच्या नात्याच्या बातम्यांमुळे देखील प्रसिद्धी झोतात आहेत.अशात सध्या जॉर्जियाने शेअर केलेला तिचा बाथरूम सेल्फी सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होतोय. (Giorgia Andriani bold look)
जॉर्जिया एंड्रियानी ही मूळची इटलीची आहे. जॉर्जिया मुंबईतील मायानगरीमध्ये दीर्घकाळ राहत आहे आणि अनेक प्रसंगी ती फिल्म इंडस्ट्रीशी संबंधित कार्यक्रमांमध्ये दिसली आहे. इतकंच नाही तर जॉर्जिया सोशल मीडियावर देखील खूप सक्रिय आहे, ज्यामुळे तिचे लेटेस्ट फोटो आणि व्हिडिओ चाहत्यांमध्ये चर्चेचा विषय बनतात.जॉर्जियाने तिच्या अधिकृत इंस्टाग्राम हँडलवर काही फोटो शेअर केले. या फोटोंमध्ये जॉर्जिया बाथरूममध्ये मिरर सेल्फी घेताना दिसत आहे.इतकंच नाही तर या फोटोंमध्ये तिचा बोल्ड लूकही सर्वांची मनं जिंकत आहे.चाहत्यांनी तिच्या पोस्टवर लाईक्स आणि कमेंटचा अक्षरशः पाऊस पाडला आहे. (Giorgia Andriani hot)
View this post on Instagram
जॉर्जियाचे बॉलिवूड पदार्पण
2019 मध्ये, जॉर्जिया एंड्रियानीने बॉलिवूड चित्रपट अभिनेता श्रेयस तळपदेच्या ‘बजरंगपूर’ चित्रपटाद्वारे अभिनयाच्या दुनियेत पदार्पण केले. त्यानंतर ती अनेक म्युजिक अल्बममध्ये दिसली आहे. नुकतेच अन्नू कपूर यांच्या ‘नॉन स्टॉप धमाल’मध्ये देखील जॉर्जिया एंड्रियानीची झलक पाहायला मिळाली.