Bollywood: अभिनेता अरबाज खान (Arbaaz Khan) आणि जॉर्जिया एंड्रियानी (Giorgia Andriani) यांच्या ब्रेकअपच्या चर्चा मागील काही दिवसांपासून सुरू होत्या. अखेर दोघांच्या ब्रेकअपबाबत जॉर्जिया एंड्रियानी मोठा खुलासा केला आहे. एका मुलखतीदरम्यान जॉर्जियाने अरबाजसोबत ब्रेकअप झाल्याचे स्पष्ट केले आहे. सध्या तिची ही मुलाखत चांगलीच चर्चेत आली आहे. या मुलाखतीत जॉर्जियाने अरबाजची पत्नी मलायका अरोराबाबत देखील भाष्य केले आहे. मलायका अरोराला घटस्फोट दिल्यानंतर अरबाज जॉर्जियाला डेट करू लागला होता.
जॉर्जिया एंड्रियानीने पिंकविलाशी बोलताना सांगितले की, “आता आम्ही दोघे मित्र असून, नेहमी चांगले मित्र राहु. सुरुवातीला थोडं कठीण होतं, पण हळूहळू सगळं ठीक झालं. आम्ही दोघांनी परस्पर संमतीने वेगळे होण्याचा निर्णय घेतला होता. पण मला अरबाज खानची एक्स गर्लफ्रेंड म्हटले जाते याचे वाईट वाटते.” तिला आणि अरबाजला या गोष्टीची जाणीव खूप आधीपासूनच होती की त्यांचं नातं फार काळ टिकणार नाही.
या मुलाखतीदरम्यान जॉर्जिया एंड्रियानीला मलायका अरोराबद्दलही विचारण्यात आले. ज्याला उत्तर देताना जॉर्जिया एंड्रियानी म्हणाली की ‘मलायका अरोरामुळे आमच्या नात्यावर कोणताही परिणाम झाला नाही.’ दरम्यान, जॉर्जिया आणि अरबाज यांना एप्रिल महिन्यात आयपीएल सामन्यादरम्यान एकत्र दिसले होते. मात्र त्यानंतर ते कधीच एकत्र दिसले नाहीत.
अखेर त्यांच्या ब्रेकअपच्या चर्चांवर शिक्कामोर्तब झाला आहे. अरबाजने मलायकाला 2017 मध्येच घटस्फोट दिला होता. त्यानंतर जॉर्जिया आणि अरबाज एकमेकांना 2017 पासून डेट करू लागले होते. मलायका आणि अरबाजला अरहान खान हा मुलगा आहे. सध्या मलायका अभिनेता अर्जुन कपूरला डेट करत आहे.
दरम्यान, जॉर्जियाने मॉडेलिंगद्वारे आपल्या करिअरची सुरुवात केली. त्यानंतर 2017 मध्ये तिने ‘गेस्ट इन लंडन’ या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. मात्र अरबाज खानसोबतच्या नात्यामुळे ती चर्चेत आली होती. अनेकदा हे दोघे एकत्र स्पॉट झाले आहेत.