Arbaaz khan : अभिनेता अरबाज खान काही दिवसांपूर्वीच दुसऱ्यांदा लग्न बंधनात अडकला. अभिनेत्री मलायका अरोरासोबत घटस्फोट घेतल्यानंतर त्याने शूरा खान हिच्याशी विवाह केला. 24 डिसेंबर रोजी कुटुंबीय आणि मित्र-मंडळींच्या उपस्थितीत शूरा-अरबाजचा विवाह पार पडला. त्यांच्या लग्नाचे अनेक व्हिडिओ आणि फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले होते. नुकताच अरबाजने शुराचा लग्नानंतरचा पहिला वाढदिवस साजरा केला. यानिमित्त त्याने एक रोमॅंटिक फोटोसह पोस्ट शेअर केली आहे.
अरबाजने दुसरी पत्नी शूरासाठी शेअर केलेल्या पोस्टमुळे नेटकऱ्यांनी त्याला ट्रोल केले आहे. ‘ वाढदिवसाच्या शुभेच्छा शुरा… तुझ्या शिवाय दुसरं कोणीच मला इतकं आनंदी ठेवू शकत नाही. माझं उर्वरीत आयुष्य मला तुझ्यासोबत जगायचं आहे’ असं अरबाजने पोस्टमध्ये लिहिले आहे. सध्या अरबाज याची पोस्ट सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत असून यामुळे त्याला ट्रोलिंगचा सामना करावा लागत आहे.
View this post on Instagram
अनेक युजर्सनी अरबाजला ट्रोल करत कमेंट्स लिहील्या आहेत. ‘खोटारडा मलायकाला सुद्धा असंच बोलला असशील ना ‘अशी कमेंट एका युजरने केली. तर ‘काही वर्षांपूर्वी तू मलायकाबद्दल असच बोलला होता.. आता काही वर्षांनी अजून कोणासाठी तू अशीच पोस्ट करशील’ असं दुसऱ्या युजरने लिहीलं. तर काहींनी या पोस्टमुळे अरबाजची पहिली पत्नी मलायका अरोरा हिला मिरच्या झोंबल्या असतील, अशी टीकाही केली.
दरम्यान, मलायका अरोरा आणि अरबाज खान यांचे 1998 मध्ये लग्न झाले होते. अरबाज-मलायका या दोघांना एक मुलगा आहे. पण लग्नाच्या 18 वर्षांनंतर अरबाज आणि मलायका यांनी घटस्फोटाचा निर्णय घेतला. सध्या मलायका अभिनेता अर्जुन कपूरला डेट करत आहे. त्याचे अनेक फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत असतात. मध्यंतरी त्यांच्यात वाद झाल्याच्या बातम्याही समोर आल्या होत्या.