टोरांटो (कॅनडा): चीनच्या दडपशाहीच्या धोरणाविरोधात आवाज उठवण्यासाठी कॅनडामध्ये शनिवारी एका व्यापक निदर्शनांचे आयोजन करण्यात आले होते. त्यामध्ये भारत, तिबेटी, व्हिएतनाम आणि तैवानचे कॅनडामधील विद्यार्थी आणि स्थानिक नागरिक सहभागी झाले होते.
कॅनडा हॉंगकॉंग लींक, बांग्लादेश अल्पसंख्य हक्क आघाडी, भारतीय, तिबेटियन, व्हिएतनाम व्हिएतनामच्या स्थानिक रहिवाशांनी या रॅलीचे आयोजन केले होते. या निदर्शनांमध्ये सहभागी झालेल्या निदर्शकांनी हातामध्ये भारत, अमेरिका आणि तिबेटचे ध्वज घेतले होते. त्यांनी भारत आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या समर्थनार्थ घोषणाबाजीही केली. त्यांनी चीनच्या निषेधाचे फलकही फडकावले होते. चीनच्या कम्युनिस्ट पार्टीकडून चीनमधील उईघ्युर मुस्लिमांना दिल्या जात असलेल्या अमानवी वागणुकीचा मुद्दाही यावेळी उपस्थित करण्यात आला.
जगातील सर्वात मोठा लोकशाही देश असलेल्या भारताने चीनशी कसा सामना केला पाहिजे, याचे उदाहरण जगासमोर घालून दिले आहे, असे एका निदर्शकाने सांगितले. तर चीनने नवीन राष्ट्रीय सुरक्षा कायद्याद्वारे हॉंगकॉंगचा ताबा घेतला आहे. आता चीन हॉंगकॉंगच्या सर्व जनतेचे नियंत्रण आपल्या हातात घेत आहे, असे एका अन्य निदर्शक युवतीाने सांगितले.
तर जगभरात चीनच्या दडपशाहीचा सामना करत असलेल्या सर्व देशांना आमचा पाठिंबा असल्याचे आणखी एका निदर्शकाने सांगितले.