लखनौ – योगी सरकारच्या मंत्रीमंडळात एकमेव मुस्लिम मंत्री दानिश आझाद अन्सारी यांचा समावेश आहे. दानिश अन्सारी हे अनेक वर्षापासून राजकारणात सक्रिय आहे. तसेच अन्सारी हे योगींच्या जवळचे मानले जाते.
अन्सारी हे अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचे कार्यकर्ते आहेत. अन्सारी यांनी सुरुवातीचे शिक्षण बलिया येथून पूर्ण केले. त्यानंतर लखनौ येथून पदवीचे शिक्षण पूर्ण केले. अन्सारी यांना 2017 साली उर्दू भाषा समितीचे सदस्य बनवले होते. 2021 साली त्यांना अल्पसंख्यांक मोर्चाचे महामंत्री म्हणून जबाबदारी दिली.
आता त्यांना मंत्री पदाची जबाबदारी देण्यात आली आहे. 32 व्या वर्षी ते योगी सरकारच्या कॅबीनेटचा चेहरा आहे. लखनौ विद्यापीठातून त्यांनी बी. कॉम पूर्ण केले. त्यानंतर त्यांनी मास्टर क्वालिटी मॅनेजमेंट आणि मास्टर ऑफ पब्लिक ऍडमिनिस्ट्रेशनचे शिक्षण घेतले आहे.