हिंगोली – मराठा समाजाला आरक्षण (Maratha Arakshan) हे मिळालेच पाहिजे, अशी तीव्र भूमिका मराठा समाजाकडून घेण्यात येत आहे. मराठा आरक्षणसाठी सरकारला महिन्याभराचा वेळ देऊन देखील याबाबत कोणताही निर्णय न घेतल्याने बुधवारपासून मनोज जरांगे-पाटील (Manoj Jarange Patil) यांनी पुन्हा आमरण उपोषणाला सुरुवात केली आहे.मात्र आरक्षणासाठी राज्यातील आणखी एका तरुणाने आपले जीवन संपवल्याचे समोर आले आहे.
मराठा आंदोलक आरक्षणासाठी (Maratha Reservation) आपला जीव देत असल्याने पुन्हा एकदा खळबळ उडाली आहे. मागील आठवड्यात चार मराठा आंदोलकांनी पाच दिवसांत आत्महत्या केल्या होत्या. त्यानंतर आज पुन्हा एका मराठा आंदोलकाने आपली जीवनयात्रा संपवली आहे. (Sucide for maratha arakshan)
समोर आलेल्या माहितीनुसार, हिंगोली (hingoli sucide) येथील कळमनुरी तालुक्यातील आखाडा बाळापूर शेवाळा शिवारात मराठा समाजातील एका तरुणाने झाडाला गळफास घेत आत्महत्या केल्याची ह्रदयद्रावक घटना उघडकीस आली आहे.
नवनाथ उर्फ कृष्णा यशवंतराव कल्याणकर (वय 23) असे या तरुणाचे नाव आहे. “मी मराठा आरक्षणामुळे जीव देत आहे.’ अशा आशयाची चिठ्ठी लिहित तरुणाने आत्महत्या केल्याची माहिती समोर आली आहे. नवनाथ हा देवजणा येथील रहिवासी असल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले आहे. (Sucide for maratha reservation)