पिंपरी – शहरामध्ये गुरुवारी (दि. 11) नव्याने 133 करोना बाधित रुग्ण आढळले. मंचर येथील 65 वर्षीय पुरुष रुग्णाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला.शहरातील रुग्णालयातून आज 134 रुग्ण करोनामुक्त झाले. त्यांना घरी सोडण्यात आले आहे. रुग्णालयामध्ये सध्या 664 करोनाबाधित रुग्णांवर उपचार सुरू आहे. तर, एकूण 1 हजार 99 रुग्णांना गृह विलगीकरणात ठेवण्यात आले आहे. शहरातील रहिवाशी असलेले मात्र महापालिका हद्दीबाहेरील रुग्णालयांमध्ये 108 रुग्ण दाखल आहेत. करोना संशयित 1 हजार 176 रुग्णांना उपचारासाठी दाखल केलेले आहे. 908 रुग्णांच्या करोना चाचणी अहवाल निगेटिव्ह आलेला आहे. 668 रुग्णांच्या करोना चाचणीचा अहवाल प्रतीक्षेत आहे.
शहरामध्ये आत्तापर्यंत एकूण 1 लाख 1 हजार 381 जणांना करोनाची लागण झाली. त्यातील 97 हजार 792 रुग्ण करोनामुक्त झाले. आत्तापर्यंत एकूण 1 हजार 826 रुग्णांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. तर, शहराबाहेरील 769 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.
कोविड लसीकरण
गेल्या 24 तासांमध्ये 620 जणांना कोविड-19 चे लसीकरण करण्यात आलेले आहे. आतापर्यंत शहरातील 11320 करोना योद्ध्यांना लस देण्यात आली आहे.