मुंबई – अंकिता लोखंडे या आठवड्यात ‘डीआयडी सुपर मॉम’ या रिअॅलिटी शोमध्ये विशेष अतिथी म्हणून दिसणार आहे, ज्याचा एक प्रोमो व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर फिरत आहे. या व्हिडिओमध्ये ती खूपच भावूक दिसत आहे. खरं तर, शोच्या आगामी भागात, दिवंगत अभिनेता सुशांत सिंग राजपूतला एक परफॉर्मन्स समर्पित करण्यात आला होता त्यावेळी अंकिता चांगलीच भावूक झाल्याचे पाहायला मिळाले.
यावेळी पवित्र रिश्ता मालिकेतील सहकलाकार आणि ज्येष्ठ अभिनेत्री उषा नाडकर्णी देखील अंकितासोबत शोच्या प्रोमोमध्ये दिसल्या.यावेळी स्पर्धक शोमध्ये सुशांत सिंग राजपूतसाठी परफॉर्म करताना दिसले. हा परफॉर्मन्स पाहून अंकिता आणि उषा नाडकर्णी दोघीही रडताना दिसल्या. यावेळी अंकिता लोखंडे म्हणाली, ‘तो खूप जवळचा मित्र होता… तो जिथे आहे तेथे खूप खुश असेल गॉड ब्लेस हिम”. आता या शोचा प्रोमो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
View this post on Instagram
सुशांत सिंह राजपूत 14 जून रोजी त्याच्या मुंबईतील राहत्या घरी मृतावस्थेत आढळला होता. त्यांनी राहत्या घरी आत्महत्या केली होती. सुशांतने ‘पवित्र रिश्ता’ मधून मानव म्हणून करिअरला सुरुवात केली होती. या शोच्या निमित्ताने फॅन्सला सुशांतची चांगलीच आठवण आल्याचे सोशल मीडियावर पाहायला मिळाले.