मुंबई – गणेश चतुर्थीच्या दिवशी रितेश देशमुख आणि जेनेलिया डिसूझा यांनी महागडी कार खरेदी केली होती. हे स्टार कपल आपल्या मुलांसह सलमान खानची बहीण अर्पिताच्या घरी गाडीतून बाप्पाची दर्शन घेण्यासाठी पोहोचले होते.
View this post on Instagram
त्यांनी BMW IX इलेक्ट्रिक कार खरेदी केली आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, या जोडप्याचे हे दुसरे इलेक्ट्रिक वाहन आहे. व्हायरल व्हिडिओमध्ये रितेश देशमुखने पांढऱ्या रंगाचा पारंपरिक ड्रेस परिधान केला होता. रितेश, जेनेलिया मुलांसह मरून रंगाच्या BMW मध्ये दिसले. दोघेही आपल्या मुलांसोबत खूप आनंदी दिसत होते. रितेश देशमुख आणि जेनेलिया डिसूजा यांना बॉलिवूडमधील सर्वात क्यूट कपल्स म्हणून ओळखले जाते.
घराच्या एंट्री गेटवर पापाराझींनी रितेश देशमुख आणि त्याच्या कारचे फोटो काढले आणि त्याचा व्हिडिओ त्याच्या इंस्टाग्राम अकाउंटवर शेअर केला. रितेश ड्रायव्हिंग सीटवर बसलेला दिसला. BMW IX ही जर्मन ऑटोमेकरची इलेक्ट्रिक कार आहे, ज्याची किंमत भारतात 1.16 कोटी रुपयांपेक्षा जास्त आहे.
मुंबईत कारची ऑन-रोड किंमत सुमारे 1.43 कोटी रुपये आहे. हे नवीन मॉडेल iX हे पहिले सर्व-इलेक्ट्रिक प्रकार आहे. जेनेलिया डिसूझाने याआधी 2017 मध्ये रितेशला त्याच्या वाढदिवशी ‘टेस्ला मॉडेल एक्स’ कार भेट दिली होती.
रितेश त्याच्या कारच्या आवडीसाठी ओळखला जातो आणि त्याच्याकडे सुपर कारचे उत्कृष्ट कलेक्शन आहे ज्यामध्ये 3.5 कोटी रुपयांची बेंटले फ्लाइंग स्पर, 2 कोटी रुपयांची लँड रोव्हर रेंज रोव्हर वोग, 1.4 कोटी रुपयांची BMW 7-सीरीजचा समावेश आहे. यामध्ये मर्सिडीज-बेंझ एस-क्लासचाही समावेश आहे, ज्याची किंमत 1.3 कोटी रुपये आहे.