बॉलीवूड अभिनेता आमिर खानचा काही स्टाफ करोना पॉझिटिव्ह असल्याचे आढळले. यानंतर आमिर खान आणि त्याच्या कुटुंबातील सदस्यांची चाचणी घेण्यात आली. आमिर खान आणि त्याच्या कुटुंबाचीकरोना टेस्ट निगेटिव्ह आली. पण आमिर खानच्या आईचा टेस्ट अहवाल आला नव्हता. आता आमिरच्या आईची करोना टेस्टचा अहवाल निगेटिव्ह आला आहे. याबाबत त्याने सोशल मीडियावर माहिती देत सुटकेचा निःश्वास सोडला आहे.
आमिर खानने लिहिले की, हॅलो एव्हिवान, मला हे सांगताना खूपच चांगले वाटत आहे की, अम्मीचा कोविड-19चा निकाल निगेटिव्ह आला आहे. सर्वांच्या शुभेच्छा आणि प्रेमाबद्दल धन्यवाद.
वर्क फ्रंटबाबत सांगायचे झाल्यास आमिर खान अखेर “ठग्स ऑफ हिंदोस्तान’ या चित्रपटात दिसला होता. या चित्रपटाला चाहत्यांचा चांगला प्रतिसाद मिळाला नाही. आता आमिर लवकरच “लाल सिंह चढ्ढा’चित्रपटात झळकणार आहे. या चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख अद्याप निश्चित करण्यात आलेली नाही. आमिर खानचा या चित्रपटातील फर्स्ट लूक रिलीज झाला असताना यात करिना कपूर खान देखील महत्त्वपूर्ण भूमिकेत आहे.