बॉलीवूड अभिनेत्री अनन्या पांडे सध्या लास वेगास येथे आहे. तिथं ती अभिनेता विजय देवरकोंडासोबत आपल्या आगामी चित्रपटाचे शूटिंग करत आहे. यावेळी अनन्या आणि विजय देवरकोंडा हे “लाइगर’च्या सेटवर घोडेस्वारीचा आनंद घेत आहेत.
अनन्या पांडेने आपल्या इंस्टाग्रामवर नुकतेच घोडेस्वारीचे काही फोटो चाहत्यांशी शेअर केले आहेत. या फोटोंवरून अभिनेत्री अनन्या चित्रपटाच्या सेटवर खूपच मौजमजा करत असल्याचे दिसून येत आहे.घोडेस्वारी करताना अनन्याने काळी पॅट, पांढरे बूट आणि एक गोल्फर टोपीसोबत एक पिवळ्या रंगाच्या टी-शर्टमध्ये खूपच देखणी दिसत आहे.
यंदाचे वर्ष अनन्यासाठी खूपच लाभदायक ठरत असून तिने वर्षभरात अनेक चित्रपट साइन केल्यानंतर ती आता लास वेगास, नेवाडा येथे आहे. जिथे ती तिच्या “लाइगर’ चित्रपटासाठी शूटिंग करत आहे.
या चित्रपटाद्वारे ही अभिनेत्री सर्वात तरुण पॅन-इंडिया स्टार बनण्यासाठी सज्ज झाली आहे. वर्क फ्रंटबद्दल बोलायचे झाल्यास अनन्या पांडे “लाइगर’ चित्रपटात झळकणार आहे. याशिवाय ती सिद्धांत चतुर्वेदीसोबत “खो गये हम कहॉं’मध्ये काम करणार आहे.