नवी दिल्ली – देशातील करोना रूग्णांमध्ये गेल्या 24 तासांत 51 हजार 667 इतकी वाढ झाली आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार त्यामुळे देशातील एकूण करोनाग्रस्तांचा आकडा आता 3 कोटी 1लाख 34 हजार 445 इतका झाला आहे.
दरम्यान गेल्या 24 तासांत करोनाचे 1329 रूग्ण दगावल्याने करोनामुळे मरण पावलेल्यांची संख्या 3 लाख 93 हजार 310 इतकी झाली आहे. देशात सध्या करोनाचे सक्रिय बाधित 6 लाख 12 हजार 868 इतके आहेत.
देशाचा करोना रिकव्हरी रेट आता 96.66 टक्के इतका झाला आहे. तर मृत्यू दर 1.31 टक्के इतका नोंदवला गेला आहे. करोनाचा पॉझिटीव्हीटी रेट 2.98 टक्के इतका झाला आहे. दरम्यान देशात लस घेतलेल्या नागरीकांची संख्या आता 30 कोटी 79 इतकी झाली आहे.