नोकरीचे आमिष दाखवून न्यूड फोटोंची मागणी करणाऱ्याला अटक

महिलांना फाईव्हस्टार हॉटेलमध्ये नौकरीचे द्यायचा अमिष

हैदराबाद – महिलांना नोकरीचे आमिष दाखवून त्यांच्याकडून न्यूड फोटो मागवणाऱ्या चेन्नईच्या एका सॉफ्टवेअर इंजिनीअरला पोलिसांनी अटक केली आहे. यावेळी पोलिसांनी आरोपीला महिलांची फसवणूक केल्याप्रकरणी बेड्या ठोकल्या आहेत.

त्यांच्यावर असा आरोप आहे की, त्याने अनेक महिलांना फाइव्ह स्टार हॉटेलच्या फ्रंट ऑफिसमध्ये जॉब देण्याचे आश्वासन देऊन त्यांच्याकडे न्यूड फोटोची मागणी करायचा. याच प्रकरणी आरोपीला पोलिसांनी अटक केली असून आता याबाबतीत अनेक धक्कादायक गोष्टी समोर येत आहेत.

चेन्नईतील एका आयटी कंपनीत काम करणाऱ्या प्रदीप याला पोलिसांनी 22 ऑगस्टला एका महिलेने केलेल्या तक्रारीच्या आधारावर अटक करण्यात आली. आरोपी प्रदीपच्या मोबाइलमधून महिलांचे जवळजवळ 60 न्यूड फोटो सापडले आहेत. त्यामुळे आरोपीने अनेक महिलांकडे अशाच प्रकारची मागणी केल्याचे समोर आले आहे.

एका महिलेने केलेल्या तक्रारीत असे म्हटले आहे की, आरोपी प्रदीप याने एका फाइव्ह स्टार हॉटेलमध्ये नोकरी देण्याचे आमिष दाखवून माझ्याशी संपर्क साधला होता. महिलेच्या तक्रारीनुसार, आरोपीने तिच्याकडे एक साधा फोटो मागितला. यानंतर त्याने तिच्याकडे थेट न्यूड फोटोची मागणी केली होती. यासाठी त्याने असे कारण दिले की, हॉटेलला तिचे शरीर नेमके कसे आहे याबाबत जाणून घ्यायचे आहे. महिलेने आरोपीच्या बोलण्यावर विश्वास ठेऊन त्याला आपले न्यूड फोटो देखील पाठवले. पण त्यानंतर प्रदीपने अचानक महिलेशी बोलण बंद केल.

याबाबत मियापूर सर्कलचे पोलीस अधिक्षक एस व्यंकटेश यांनी सांगितले की, चौकशीत आढळून आले आहे की, आरोपीने अशाच प्रकारे अनेक महिलांना फसवल होत. त्यांना नोकरी देण्याच आमिष दाखवून तो त्यांच्याकडे त्यांच्या न्यूड फोटोंची मागणी करायचा. महिलांनी आपले फोटो पाठवल्यानंतर तो त्यांच्याशी संपर्क तोडून टाकायचा.

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.

×