अहमदिया मुस्लिमांनी डोनाल्ड ट्रम्प यांच्यासमोर मांडले गाऱ्हाणे

वॉशिंग्टन- अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी जुलै महिन्यात व्हाईट हाऊसमध्ये विविध देशांमधल्या धार्मिक आधारांवर भेदभाव झालेल्या पीडितांची भेट घेतली. त्यावेळी अब्दुल शुकूरया पाकिस्तानी अहमदिया मुस्लिमव्यक्तीने ट्रम्पयांच्या समोर आपले गाऱ्हाणे मांडल्याचा एक व्हिडियो सध्या सोशम मिडियावर चांगलाच व्हायरल होताना दिसून येतो आहे.

गेल्या महिन्यात अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी व्हाईट हाऊसमध्ये विविध देशांमधल्या धार्मिक आधारांवर भेदभाव झालेल्या पीडितांची भेट घेतली, त्यावेळचा हा व्हिडिओ असल्याची माहिती आहे. भेट घेणाऱ्यांमध्ये एका 81 वर्षीय अहमदीया मुस्लीम समुदायाच्या अब्दुल शुकूर नावाच्या प्रौढ व्यक्तीचाही समावेश होता.

त्यांनी ट्रम्प यांच्यासमोर पाकिस्तानात होत असलेल्या अत्याचाराचा पाढा वाचला. अहमदी मुस्लिमांना पाकिस्तानात मुलभूत हक्कही नाकारण्यात आल्याचं त्यांनी ट्रम्प यांना सांगितल. अहमदीया पंथाच्या मुस्लिमांना पाकिस्तानात 1974 मध्ये गैर मुस्लिम घोषीत करण्यात आले आहे. त्यानंतर आमची घर जाळण्यात आली. मुलभूत हक्क नाकारले गेले. आमचे उद्योग व्यवसाय संपविण्यात आले.

त्या परिस्थितीत पत्नी आणि मुलांना घेऊन आम्ही दुसऱ्या भागात (ठरलुरह) स्थायीक झालो, तेथे मी पुस्तक विक्रीचा व्यवसाय सुरू केला. पण त्यांनी मला नाहक तुरुंगात डांबून पाच वर्षांची शिक्षा दिली आणि 6 लाखांचा दंड ठोठावण्यात आला. यानंतर तीन वर्षांची शिक्षा भोगल्यानंतर माझी सुटका करण्यात आली आहे. मी अमेरिकेत आहे म्हणून स्वतःची ओळख मुस्लीम अशी करुन देऊ शकतो, पण पाकिस्तानात स्वतःला मुस्लीम म्हणू शकत नाही, अन्यथा मला कठोर शिक्षा होईल, असं हा व्यक्ती ट्रम्प यांना सांगताना दिसतोय.

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.

×