कचरा वाहतुकीच्या वाहनांसाठी महापालिका शोधणार पर्यायी जागा

पिंपरी – निगडी-प्राधिकरण येथील डॉ. हेडगेवार भवनाच्या परिसरातील मोकळ्या जागेत उभी करण्यात येणारी कचरा वाहतुकीची वाहने पर्यायी जागा मिळाल्यानंतर हलविण्यात येणार आहेत, अशी माहिती आरोग्य वैद्यकिय अधिकारी डॉ. के. अनिल रॉय यांनी दिली आहे.

डॉ. हेडगेवार भवनाच्या परिसरातील मोकळ्या जागेत कचरा वाहतुकीची वाहने उभी केली जात आहे. याचा स्थानिक पातळीवरुन मोठा विरोध केला जात आहे. त्याला अनुसरून डॉ. रॉय यांनी याबाबत महापालिका प्रशासनाची भूमिका स्पष्ट करणारे पत्र गोरखे यांना दिले आहे.
पत्रात त्यांनी म्हटले आहे की, शहरातील घरोघरचा कचरा गोळा करणे व त्याची वाहतूक करण्याच्या कामासाठी 2 संस्थांची नियक्‍ती केली आहे. त्यानुसार शहराच्या दक्षिण भागासाठी नियुक्त ए.जी.एनव्हॉयरो इन्फ्रा प्रोजेक्‍टस या संस्थेला डॉ. हेडगेवार भवनाच्या परिसरातील जागा कचरा संकलनाची वाहने पार्किंग करण्यासाठी तसेच वाहन दुरूस्तीसाठी कार्यशाळा म्हणून वापर करण्यास आठ वर्ष कालावधीचा करारनामा करून हस्तांतरित केली आहे.

या जागेत नियमित साफसफाई करणे व स्वच्छता ठेवण्यासाठी संबंधित संस्थेला कळविले आहे. त्याठिकाणी असलेले टॉयलेट ब्लॉक्‍स देखील अन्यत्र हलविण्याच्या सूचना दिल्या आहेत. तसेच, संबंधित जागेत असलेले भंगार साहित्य हटविण्याची कार्यवाही देखील प्रस्तावित आहे.
तथापि, सद्य:स्थितीत महापालिकेकडे कचरा संकलनाची वाहने पार्किंगसाठी जागा उपलब्ध नाही. जागेचा शोध सुरू आहे. त्यामुळे तुर्तास संबंधित वाहने हलविणे शक्‍य होणार नाही. महानगरपालिकेस इतर ठिकाणी पर्यायी जागा उपलब्ध झाल्यानंतर ही वाहने तिथे
हलविण्यात येतील.

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.