मुंबई- गेल्या अनेक वर्षांपासून प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजविणारे बॉलिवूड चे महानायक लवकरच मराठी चित्रपटात दिसून येणार आहेत. नुकतंच अमिताभ बच्चन यांच्या ‘एबी आणि सीडी’ या चित्रपटाचं ऑफिशल पोस्टर सोशल मीडियावर रिलीज करण्यात असून, या पोस्टरची सध्या चांगलीच चर्चा रंगू लागली आहे. या पोस्टरमध्ये मराठी चित्रपट आणि रंगभूमीवरचे ज्येष्ठ अभिनेते ‘विक्रम गोखले’ देखील अभिताभ यांच्या स्टाईलमध्ये उभे असल्याचं दिसून येत.
“AB” येतोय आपला मित्र “CD” ला भेटायला.
Produced By : @akshayent & @PlanetMarathi
In Association with Golden Ratio Films, KVR Productions & Krishna Persaud Presents
Directed By : @lelemilind
Starring : @SrBachchan, Vikram Gokhale & Many More!चंदू!
मी आलो!??#ABaaniCD pic.twitter.com/0auA4TwL2D— Planet Marathi (@PlanetMarathi) September 5, 2019
तब्ब्ल 25 वर्षांनंतर बिग बी मराठी चित्रपटात मुख्य भूमिका साकारत आहे. त्यामुळे त्यांचे फॅन्स भलतेच खुश झाले आहेत. ‘एबी आणि सीडी’ या चित्रपटात दोन जिवलग मित्रांची कथा रसिकांना पाहायला मिळणार आहे. चित्रपटात बिग बी आणि विक्रम गोखले हे दोघे दोन मित्रांच्या भूमिकेत दिसणार आहे. ‘एबी आणि सीडी’ चित्रपटाचं दिग्दर्शक मिलिंद लेले यांचं असून, लवकरच हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला आहे.
View this post on Instagram