दमास्कस : उत्तर सिरीयातील एक लष्करी तळ अमेरिकेच्या विमानांनी उद्ध्वस्त केला. हा तळ अमेरिकेनेच यापुर्वी उभारला होता. त्याच्यावर बंडखोरांनी ताबा मिळवला होता. आइन अल अराब या शहराच्या जवळील खराब येथे हा तळ होता. त्यावर तुर्कीश बंडखोरांनी अमेरिकेचे सैन्य माघारी गेल्यावर ताबा मिळवला होता. अमेरिकेच्या पाठींब्यावर सिरीयाने उत्तरेकडील सर्व तळावर आपला ताबा मिळवला आहे.