मंचर -आंबेगाव तालुक्यात करोनाबाधित रुग्णांची संख्या 290 वर पोहोचली आहे. तालुक्यात गेल्या 24 तासांत 13 रुग्ण आढळून आले आहेत. 203 रुग्ण बरे झाले असून 82 रुग्णांवर उपचार सुरू आहेत, अशी माहिती तालुका आरोग्य अधिकारी डॉ. सुरेश ढेकळे यांनी दिली.
तालुक्यात आज दोन रुग्णांना घरी सोडले असून आतापर्यंत पाच जणांचा मृत्यू झाला आहे. मंचर 2, कुरवंडी 1, अवसरी खुर्द 1, चास 1, पारगाव 1, शिनोली 1 असे एकूण 7 रुग्ण शनिवारी (दि.1) करोनाबाधित आढळले आहेत. तर रविवारी (दि. 2) मंचर, अवसरी बुद्रुक, काठापूर, थुगाव येथे प्रत्येकी 1 तर अवसरी खुर्द येथे 2 रुग्ण आढळले.
करोनाबाधित रुग्णांच्या संपर्कातील व्यक्तींना होमक्वारंटाइन करण्यात आले आहे. नागरिकांनी महत्त्वाच्या कामाव्यतिरिक्त घराबाहेर पडू नये. बाहेर पडताना मास्कचा वापर करावा. अन्यथा पोलिसांच्या कारवाईला सामोरे जावे लागेल, असा इशारा मंचरचे पोलीस निरीक्षक कृष्णदेव खराडे, घोडेगाव पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रदीप पवार यांनी दिला आहे.