मुंबई – देशातील सर्वात प्रसिद्ध उद्योगपती मुकेश अंबानी आणि त्यांची पत्नी नीता अंबानी यांच्या मुंबईतील वांद्रे कुर्ला कॉम्प्लेक्स येथील क्लचरल सेंटरचा उद्धाटन सोहळा काही दिवसांपूर्वीच पार पडला. ‘नीता मुकेश अंबानी कल्चरल सेंटर’ हे देशातील सर्वात मोठं कलाकेंद्र आहे. यात नृत्य, अभिनय, संगीत, साहित्य अशा अनेक गोष्टींचा समावेश असणार असून, यातून भारतीय संस्कृती जोपासली जाणार आहे.
अंबानी कुटुंबाची नेहमीच सर्वत्र चर्चा रंगलेली असते. त्यांची प्रत्येक गोष्ट सोशल मीडिया आणि चाहत्यांमध्ये चर्चेत असते. कोणताही कार्यक्रम असला, तर अंबानी कुटुंब एकत्र येवून त्या कार्यक्रमाचा आनंद लूटतात. लग्न कार्यक्रमापासून ते वाढदिवसापर्यंत अंबानी कुटुंबातील अनेक कार्यक्रम मोठ्या थाटात साजरे होतात. सोशल मीडियावर देखील त्यांच्या कार्यक्रमाचे अनेक फोटो आणि व्हीडिओ तुफान व्हायरल होतात.
दरम्यान, आता पुन्हा एकदा आंबानी कुटुंब चर्चेत आल्याचं दिसत आहे. मुकेश अंबानी आपल्या कामगारांबाबतच्या काळजी घेण्याचे अनेक किस्से अधूनमधून चर्चेत येत असतात. ते त्यांच्या यशाचं श्रेय त्यांचे कर्मचारी आणि भागधारकांना देतात. त्यांच्यासाठी ते काहीही करायला एका पावलावर तयार असतात. असंच काहीसं आता पुन्हा एकदा घडल्याचं दिसून आलं आहे. मुकेश अंबानी यांनी त्यांच्या रिलायन्स ग्रुपच्या आपल्या एका कर्मचाऱ्याला आलीशान घर गिफ्ट दिले आहे.
हे घर तब्बल 22 मजल्याचे असून 1.7 लाख चौरस फूट क्षेत्रफळावर घर उभे आहे. हे घर मुंबईच्या अत्यंत उच्चभ्रु वस्तीत नेपियन्सी रोडवर उभे आहे. या निवासस्थानाची किंमत तब्बल 1500 कोटी सांगितली जात आहे. वास्तविक मुकेश अंबानी यांनी आपल्या ज्या कर्मचाऱ्याला 1500 कोटीचं घर भेट म्हणून दिले आहे. ते त्यांचा उजवा हात मानले जातात.
‘मनोज मोदी’असं त्यांचं नाव आहे. हे मुकेश अंबानी यांचे खास विश्वासू कर्मचारी असून त्यांच्या वाचून त्यांचे पानही हलत नाही. मुकेश यांच्या सगळ्यात जवळच्या व्यक्तींमध्ये त्यांचा समावेश होतो. दरम्यान, मनोज मोदी यांनी 1980 च्या दशकाच्या सुरूवातीला रिलायन्समध्ये त्यांनी प्रवेश केला. मुकेश यांचे पिताश्री रिलायसन्स इंडस्ट्रीचे संस्थापक धीरूभाई अंबानी यांच्या नेतृत्वाखाली त्यांनी रिलायसन्समध्ये नोकरीला सुरूवात केली.