बावडा परिसर विकासासाठी कायमच कटिबद्ध

आमदार दत्तात्रेय भरणे : भोडणी येथील दोन कोटींच्या विकासकामाचे उद्‌घाटन

रेडा- बावडा परिसरातील गावांना विकास निधी देताना कोठेही काटकसर केलेली नाही. या भागाचा विकास करण्यासाठी राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टीच्या माध्यमातून कटिबद्ध आहे, अशी ग्वाही आमदार दत्तात्रय भरणे यांनी दिली. भोडणी (ता.इंदापूर) येथे विविध विकासकामांचे उद्‌घाटन रविवार (दि.15) आमदार भरणे यांच्या हस्ते करण्यात आले. त्यावेळी ते बोलत होते.

यावेळी जिल्हा परिषदेचे बांधकाम व आरोग्य विभागाचे सभापती प्रवीण माने, इंदापूर नगरपरिषदेचे नगरसेवक बाळासाहेब ढवळे, जिल्हा परिषदेचे सदस्य अभिजित तांबिले,ज्येष्ठ नेते तानाजीराव हांगे, विलासराव हांगे, दत्तात्रेय घोगरे, नागनाथ गायकवाड, ज्योतीराम अनपट, बाळासाहेब पानसरे, जिग्नेश कांबळे, सचिन चौधरी, सुरेश जगताप, गणेश शिंदे, राहुल देवकर, नवनाथ रुपनवर, पदाधिकारी उपस्थित होते.

आमदार भरणे व माने यांच्या हस्ते भोडणी गावठाण ते अनपट वस्ती रस्त्याचे एक कोटी 96 लक्ष निधी कामाचे उद्‌घाटन करण्यात आले. अनपट वस्ती येथे आमदार भरणे यांच्या आमदार फंडातून पाच लाख रकमेच्या महालक्ष्मी मंदिराच्या सभामंडपाचे व अनपट वस्ती कॅनॉल पूल यासाठी पाच लाख निधी, अंगणवाडी शाळा खोल्यासाठी आठ लाख निधी, जगताप वस्ती येथील पाच लाख निधीचा सभामंडप, या दोन कोटी 19 लाख रकमेच्या विकासकामांचे उद्‌घाटन थाटात पार पडले.

भरणे म्हणाले की, बावडा- लाखेवाडी जिल्हा परिषद गटाला जिल्हा परिषदेच्या माध्यमातून तसेच विविध शासनाच्या योजनेतून कोट्यवधीचा निधी केवळ विकासकामांसाठी मंजूर केला आहे. या भागातील कामे सुरू आहेत. या भागाचा सर्वांगीण विकास करण्यासाठी नागरिकांना मूलभूत सुविधा मिळाल्या पाहिजेत, हा उद्देश राष्ट्रवादीचा असल्याने अपेक्षित कामे मार्गी लागत आहेत. मला कोणावरही टीका करायची नाही. जनतेचा विकास करून जनतेच्या चेहऱ्यावरील आनंद कायम पाहायचा आहे.

  • मूलभूत प्रश्‍नांसाठी जिल्हा परिषदेचा निधी
    इंदापूर तालुक्‍यातील जिल्हा परिषदेच्या सातही गटांना बांधकाम विभाग व आरोग्य विभागाकडून निधी देताना दुजाभाव केला नाही. त्यामुळे गावागावातील मूलभूत प्रश्‍न जिल्हा परिषदेच्या निधीच्या माध्यमातून मार्गी लागले आहेत. तर उर्वरित व नागरिकांनी मागणी केलेली कामे पूर्ण केली जातील, अशी ग्वाही जिल्हा परिषदेचे बांधकाम सभापती प्रवीण माने यांनी दिली.
You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.