आळंदी- आळंदी देवाची पोलीस स्टेशन हद्दीतील रेकॉर्डवरील सहा गुन्हेगारांना दोन वर्षांसाठी जिल्ह्यातून तडीपार करण्यात आले आहे. तडीपार करण्यात आलेल्यांचे नाव सागर दिलीप लोखंडे (वय 26), अक्षय सुरेश लोखंडे (वय 23), शुभम मुकेश लोखंडे (वय 24), शंकर पांडुरंग लोखंडे (वय 28), वाल्मीक ज्ञानेश्वर कोतवाल (वय 24), प्रशांत देविदास लोखंडे (वय 25, सर्व रा. मरकळ, ता. खेड) आहे. पोलीस उपायुक्त परिमंडळ 1 पिंपरी चिंचवड आयुक्तालय यांच्या आदेशानुसार गुन्हेगारांना जिल्ह्यातून दोन वर्षांसाठी तडीपार करण्यात आले आहे.