पंतप्रधानांच्या हस्ते होणार कर्तारपूर कॅरिडोरचे उद्‌घाटन

नवी दिल्ली : पाकिस्तानातील श्री कर्तारपूर साहीबला जाणारा कर्तारपूर कॅरिडोरचे उद्‌घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते आठ नोव्हेंबरला होणार आहे, असे केंद्रीय मंत्री हर्शीम्रत बादल यांनी सांगितले. भारतीय बाजूकडील चेक पोस्टचे उद्‌घाटन मोदी करतील.

श्री कर्तारपूर साहीब येथील दर्शनाची आस श्री गुरुनानक देवजी यांच्या आशिर्वादाने पूर्ण होणार आहे. हे स्वप्न प्रत्यक्षात उतरणार आहे. कर्तारपूर कॅरीडोरचे उद्‌घाटन करून पंतप्रधान नरेंद्र मोदी इतिहास घडवतील, असे ट्विट त्यांनी केले आहे.

गेल्या आठवड्यात मुख्यमंत्री अमरिंदर सिंग यांनी राष्ट्रपती रामनाथ कोविंद आणि पंतर्पधान मोदी यांना गुरुनानक देव यांच्या 550व्या रोकाश पर्वात सहभागी होण्याचे निमंत्रणदिले होते. रावी नदी पार केल्यानंतर पाकिस्तानच्या नरोवाल जिल्ह्यात कर्तापूर वसले आहे. तेथून चार किमीवर डेरा बाबा नानक मंदिर आहे. तेथे भारतीय यात्रेकरूंना व्हिसाशिवाय जाता येणार आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.