लंडन – तालिबानने अफगाणिस्तानचा ताबा घेतल्यानंतर तेथून पळ काढण्याच्या प्रयत्नात तिघेजण विमानातून पडल्याचा एक व्हिडीओ प्रसिद्ध झाला आहे. काबुल विमानतळावर नागरिकांनी प्रचंड गर्दी केली होती.
अफगाण नागरिकांची भयावह परिस्थिती अमेरिकेच्या एका विमानातही दिसून आली. अमेरिकेच्या या विमानात १३४ प्रवाशांची क्षमता होती. मात्र, त्यामध्ये ८०० जणांना प्रवेश देण्यात आला.
We watch in complete shock as Taliban takes control of Afghanistan. I am deeply worried about women, minorities and human rights advocates. Global, regional and local powers must call for an immediate ceasefire, provide urgent humanitarian aid and protect refugees and civilians.
— Malala (@Malala) August 15, 2021
सर्व जगाकडून तेथे अडकलेल्या अफगाणी लोकांची चिंता व्यक्त केली जात आहे. यातच नोबेल पुरस्काराने गौरविण्यात आलेल्या मलाला युसूफजई अफगाणिस्तानमधील महिला, अल्पसंख्यांक यांच्याबाबत चिंता व्यक्त केली आहे. तिने आवाहन केले आहे की,जागतिक नेत्यांना तत्काळ शस्त्रसंधी करण्याचे तसेच निर्वासितांसाठी सीमा खुल्या कराव्या.
मलाला युसूफजई यांचे ट्विट
तालिबान – अफगाणिस्तानवाच्या धुमश्चक्री झाली आणि ती सर्वजण जगाने सुन्नपणे पाहिली. मला यावेळी अल्पसंख्याक आणि मानवी हक्क कार्यकर्त्यांची काळजी वाटते. जागतिक आणि विभागीय व स्थानिक शक्तींनी तत्काळ शस्त्रसंधी करून, तत्काळ मानवतावादी मदत द्यावी, तसेच निर्वासित आणि नागरिकांचे रक्षण करावे.