मुंबई – बॉलीवूड अभिनेत्री आलिया भट्टला (Alia Bhatt) ‘गंगूबाई काठियावाडी’ या चित्रपटासाठी सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीच्या राष्ट्रीय पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. यासाठी सर्वांनी तिचे कौतुक केले. या पुरस्कारानंतर आता आलिया पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. नवरात्रीच्या शुभमुहूर्तावर आलिया भट्टने एक नवीन कार खरेदी केली आहे. तिच्या लक्झरी कारचा व्हिडिओही समोर आला आहे.
पापाराझीने आलिया भट्टच्या नवीन कारचा व्हिडिओ शेअर केला आहे. 19 ऑक्टोबर 2023 रोजी रिलीज झालेल्या व्हिडिओमध्ये आलियाची नवीन कार दिसत आहे. आलियाने रेंज रोव्हरची ऑटोबायोग्राफी लॉन्ग व्हील बेस खरेदी केली आहे. ही कार तिने स्वत:ला गिफ्ट केली आहे. रेंज रोव्हरच्या या नवीन मॉडेलची किंमत 3.81 कोटी रुपये असल्याचे सांगण्यात येत आहे. आलियाकडे अनेक महागड्या आणि लक्झरी कार आहेत. त्यात आता आणखी एका कारचा समावेश करण्यात आला आहे.
व्हायरल होणाऱ्या व्हिडीओमध्ये आलियाने आपल्या नव्याकोऱ्या काळ्या रंगाच्या कारची पूजा देखील केल्याचे दिसते. तिच्या कारला हार घातल्याचे दिसत आहे. सध्या आलियाकडे ऑडी A6, BMW 7-Series, Audi Q5, Audi Q7 या कार आहेत.
View this post on Instagram
दरम्यान, आलिया भटसह अभिनेत्री क्रिती सेनॉनला देखील तिच्या मिमी चित्रपटातील उत्कृष्ट अभिनयासाठी राष्ट्रीय पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. आलियाला मिळालेल्या पुरस्कारासाठी तिने संजय लीला भन्साळी यांचे आभारही मानले आहेत.