पिंपरी – हॉटेल मधील सांडपाणी इतरांच्या जागेत सोडले. हॉटेल मधील घनकचऱ्याचे नियोजन न करता तो इतरांच्या जागेत टाकला. याप्रकरणी हॉटेल व्यवसाय करणाऱ्या पाच जणांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हा प्रकार शनिवारी (दि. 4) सकाळी दत्तवाडी नेरे येथे घडला.
पौर्णिमा जालिंदर शितोळे, जालिंदर शितोळे (दोघे रा. दत्तवाडी, ता. मुळशी), गाडे (रा. वाकड), गोरक्षनाथ बन्सी जाधव (रा. दत्तवाडी, ता. मुळशी), विमल बन्सी जाधव (रा. दत्तवाडी, ता. मुळशी) अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत. याप्रकरणी भरत शांताराम जाधव (वय 30, रा. नेरे दत्तवाडी, ता. मुळशी) यांनी हिंजवडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपींचे नेरे दत्तवाडी येथे यारा द जंक्शन हॉटेल आहे. त्यांनी हॉटेलचे सांडपाणी फिर्यादी यांच्या जागेत सोडून दिले. तसेच हॉटेलचा कचरा फिर्यादी यांच्या जागेत टाकून फिर्यादी यांना शिवीगाळ, दमदाटी केली. हॉटेलच्या सांडपाण्याचे व घनकचऱ्याचे नियोजन व व्यवस्थापन करणे गरजेचे असताना देखील ते केले नाही. फिर्यादी यांच्या जागेत उत्खनन केले असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.