आळंदी – जनसेवा हिच ईश्वर सेवा मानत स्वास्थ्य क्लिनिकचे डाॅ. निलेश जगदाळे व आळंदी नगरपरिषदेने गरजू रुग्णांसाठी तीर्थक्षेत्र आळंदीतील गुरुवर्य मामासाहेब दांडेकर स्मारका पाठीमागे इंद्रायणी घाटावर मोफत ओपीडी सेवा सुरु केली आहे. मंगळवारी आणि गुरुवारी दुपारी 2 ते 4 यावेळेत ही सेवा सुरु राहील. तसेच आवश्यकता असल्यास रुग्णांना शासकिय योजनेतून मोफत शस्त्रक्रियेसाठी मदत केली जणार आहे. या मोफत ओपीडीस आळंदी नगरपरिषद सर्वोतोपरी सहकार्य करणार असल्याचे नगराध्यक्षा वैजयंता उमरगेकर यांनी सांगितले आहे.
या उपक्रमाचे शनिवारी (दि. 1) नगराध्यक्षा वैजयंता उमरगेकर यांचे हस्ते उद्घाटन झाले.
या प्रसंगी आरोग्यादिप प्रकल्प प्रमुख डॉ नीलेश जगदाळे, माजी नगरसेवक डी.डी.भोसले पाटील, नगरसेविका सुनीता रंधवे, नगरसेवक सागर भोसले, गटनेते पांडुरंग वहिले, कामगार नेते अरुण घुंडरे, व्यापारी मंडळाचे माजी अध्यक्ष ज्ञानेश्वर गुळूंजकर, दैनिक प्रभातचे पत्रकार एम.डी. पाखरे , आळंदी जनहित फाऊंडेशनचे कार्याध्यक्ष अर्जुन मेदनकर, दीपक शर्मा, मच्छिंद्र जगदाळे आदी पदाधिकारी उपस्थित होते.