मुंबई – मिशन मंगल, हाऊसफुल, रुस्तम, पॅड मॅन, टॉयलेट एक प्रेम कथा आणि लक्ष्मी अश्या सुपरहिट आणि दर्जेदार चित्रपटांमधून सिनेरसिकांचे मनोरंजन करणारा बॉलिवूडचा खिलाडी कुमार म्हणजेच, अभिनेता ‘अक्षय कुमार’ हा इंडस्ट्रीतील सर्वात व्यस्त कलाकारांपैकी एक आहे. अगदी करोनाव्हायरसच्या काळात सुद्धा अक्षयकुमार आपल्या चित्रपटाच्या शूटिंगमध्ये व्यस्त होता. म्हणूनच, आपल्या हरहुन्नरी अभिनयाने अक्षयने चाहत्यांच्या मनात घर निर्माण केले आहे.
दरम्यान, दिवाळीच्या मुहूर्तावर थिएटरमध्ये रिलीज झालेल्या ‘राम सेतू’ या चित्रपटाला प्रेक्षकांचे भरभरून प्रेम मिळाले आहे. या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर कोटींची कमाई केली होती. मात्र, आता लवकरच हा चित्रपट ओटीटी प्लॅटफॉर्मवर मोफत स्ट्रीम केला जाणार आहे. या चित्रपटात अभिनेता अक्षयसोबतच जॅकलीन फर्नांडिस, नुसरत भरूचा आणि सत्यदेव कंचरण या कलाकरांनी देखील प्रमुख भूमिका साकारली आहे.
View this post on Instagram
‘राम सेतू’ हा चित्रपट प्रसिद्ध ओटीटी प्लॅटफॉर्म अॅमेझॉन प्राइम व्हिडीओवर रेंट सर्व्हिसमध्ये चित्रपट रिलीज झाला होता. त्यानंतर प्रेक्षक हे ओटीटीवर हा चित्रपट विनामूल्य रिलीजची वाट पाहत होते. आता 21 डिसेंबर पासून ‘राम सेतू’ चित्रपटाच्या विनामूल्य रिलीजची घोषणा करण्यात आली आहे. अॅमेझॉन प्राइम व्हिडिओने त्यांच्या अधिकृत इंस्टाग्राम अकाऊंटवर या बद्दल माहिती दिली आहे. त्यामुळे आता सिनेरसिकांना पुन्हा एकदा हा चित्रपट विनामूल्य पाहता येणार आहे.